🛑मूळ कविता 🛑
अनंताचा साक्षात्कार
कवयित्री - कुसुमावती देशपांडे
एखादा मास्तर असा भेटतो -
शाळेची जाम भीती घालतो
उठता बसता मारतो छडी
थरथर कापतात चिमणे गडी
विद्यार्थी ? छे, गोगलगाय
जीवनभर पोटात पाय !
सदा न् कदा छडी हाती
शाळेची, जीवनाची भीतीच भीती
एखादा मास्तर असा भेटतो -
उस्ताद नसला तरी वस्ताद असतो
प्रत्येक चोरवाटेची चावी
या पठ्ठ्याला अचूक ठावी
कुणापुढे वाकावं, कुणा लाथ मारावी
पैसे कसे पचवावे, कॉपी कशी करावी
सार्या विद्यांचे शिक्षण
सदा देतो सोदाहरण
एखादा मास्तर असा भेटतो -
जो ज्ञानाचे पंख देतो
सात स्वर्गांचे दार उघडतो
घरटं बांधायला तोच शिकवतो
घरटं उबदार पिलं शानदार
आभाळातून सारं सांभाळते घार
आभाळाचं मन काही
पिलांना ती देत नाही
नजर तीक्ष्ण एकच लक्ष्य
भक्ष्य भक्ष्य आणखी भक्ष्य !
एखादाच मास्तर असा भेटतो -
डोक्यात घट्ट रुतवून ठेवतो,
भव्य स्वप्नाचा दिव्य बाण !
अंतर्वेधी दृष्टी त्याची
पंखात घालते पंचप्राण !
पंख देतो, देतो शक्ती
नाही देत थिजली शांती
आकाशातून हिंडत असता
भूमीवर खिळवी दृष्टी
नजर नेहमी असतेच त्याची
खुरडणार्या पायांवर
दिगंतातून हिंडता हिंडता
दाखवीत असता विश्वाकार
एखादाच गुरू घडवी
अनंताचा साक्षात्कार
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🛑अहिराणी अनुवाद🛑
नितीन खंडाळे- चाळीसगाव
एखांदाच मास्तर असा भेटस-
शायनी गह्यरी भेव घालस,
उठता बसता मारस छडी
थरथर कापतस बारका गडी
विद्यार्थी ? छ्या, गोगलगाय
जलमभर पोटमा पाय !
सदा न् कदा छडी हातमा
शायनी, जीवनी भेवच भेव
एखांदाच मास्तर असा भेटस -
उस्ताद नसना तरी वस्ताद र्हास
हरेक चोरवाटेनी चाबी
या पठ्ठ्याला नेम्मन ठावूक
कुणापुढे वाको, कोन्हले लाथ मारो
पैसा कसा पचाडो, कापी कशी करो
समद्या ईद्यास्न शिक्षन
सदा देस सवता करीसन
एखांदाच मास्तर असा भेटस -
जो ग्यानना पखे देस
साती स्वर्गांस्ना दारे उघाडस
खोपा बांधाले तोच शिकाडस
खोपा उबदार पिल्ला मजाना
आभायम्हाईन समदं समायस घार
आभायन मन काही
पिल्लासले ती देत नही
नजेर बारीक एकच ध्यान
भक्ष्य भक्ष्य आखो भक्ष्य !
एखांदाच मास्तर आसा भेटस -
डोकाम्हान गच खुपशी ठेवस,
भला सपनना भारी बान !
आतम्हजारनी नजेर त्येन्ही
पखेस्मा घालस पाचीपराण !
पखे देस, देस शक्ती
नही देस गह्यरी शांती
आभायमा फिरत असता
जिमीनवर रोखस द्रिष्टी
नजेर नेहमीच र्हास त्येनी
घसडणारा पायेसवर
आभायम्हातून फिरता फिरता
देखाडत जास दुनियादारी
एखांदाच गुरू घडावस
अनंताना साक्षात्कार
#जय_अहिराणी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवाद
#अहिराणीकाव्यबोली
टीप-मूळ कविता कुसुमावती देशपांडे यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी
Khup mast
ReplyDeleteAata lihaych ka band kelas
ReplyDelete