🔶मूळ कविता🔶
ऋण
कवी-श्री. दि. इनामदार
तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥१॥
नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥२॥
माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥३॥
माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥४॥
अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५॥
मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥६॥
◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾
🔶अनुवादित-कविता🔶
रिण
©नितीन खंडाळे, चाळीसगाव
तुन्हा वावरमा राबीसन
मन्ही सरनी हयाती
नका करु हेटायनी
आते उतार वयमा ॥१॥
नही वढावस राज्या
चार पावले नागर
नका बोलजा वंगाय
नका म्हणजा डंगर ॥२॥
मन्ही ऐन उमेदम्हा
मन्ह्या गायात तू वह्या
आते चाबूकनागत
नको देऊ माले गाया ॥३॥
मन्हा घालावाले शीन
तव्हय खावाडास गुय
कव्हय घालीस झूल
कव्हय घालीस माय ॥४॥
अशा गोड आठवनी
त्येस्न करस वाघूर
माले येवू दे मरन
तुन्ह खुशाल चितत ॥५॥
मरावर तुन्हा जोडे
आखो एकसाव र्हाऊ दे
मन्हा कातडाना जोडा
तुन्हा पायमा वाजू दे॥६॥
#जय_अहिराणी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवाद
#अहिराणीकाव्यबोली
टीप-मूळ कविता श्री.दि.इनामदार यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी
No comments:
Post a Comment