Wednesday, August 14, 2019

शेपूटवाला जनावरेस्नी

🔺मूळ कविता🔺

शेपटीवाल्या प्राण्यांची

कवी- ग.दि.माडगूळकर

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला,
"मित्रांनो, देवाघरची लूट, देवाघरची लूट
तुम्हां-आम्हां सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय ?"

गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी मारीन माश्या."

घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"

कुत्रा म्हणाला, "खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."

मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."

खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."

माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."

मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात."

कांगारू म्हणाले, "माझे काय?"
"तुझे काय? हा हा हा !
शेपूट म्हणजे पाचवा पाय."

मोर म्हणाला, "पीस पीस फुलवून धरीन, मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन."

पोपट म्हणाला, "छान छान छान!
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या शेपटाचा उपयोग करा."

"नाही तर काय होईल?"
"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪

🔺अहिराणी अनुवाद🔺

कविता-शेपूटवाला जनावरेस्नी

©नितीन खंडाळे

शेपूटवाला जनावरेस्नी  भरनी व्हती सभा
मिठ्ठू व्हता सभापती आधोमध उभा

मिठ्ठू बोलना, मिठ्ठू बोलना,
"मैतरहो, देवघरनी लूट, देवघरनी लूट
तुम्हले-आम्हले समदास्ले एक एक शेपूट,
या शेपूटन करानं काय ?"

गाय बोलशी, "अश्शा अश्शा, शेपूटघई मी मारसु माश्या."

घोडा बोलना, "ध्यानमा धरसू, ध्यानमा धरसू
मीबी मन्हा शेपूटघई, आसच करसू, आसच करसू,"

कुत्रं बोलन, "खुषीमा येसू तव्हय, शेपूट हालावत ऱ्हासू."

मांजर बोलनी, "नही व माय, कुत्रासारख मन्ह आज्याबात नही,
गच्ची गच्ची रागावसू तेव्हय शेपूट फुगाडसू, शेपूट फुगाडसू"

खार बोलनी, "पडी थंडी तव्हय मन्हा शेपूटनी मालेच बंडी."

माकड बोलनं, "कव्हयं वर, कव्हयं खाले, शेपूटवर मी मारसू उडी."

मासा बोलना, "शेपूट म्हनजे दोन हात, दोन हात
पव्हत राहसू धारमान
पव्हत राहसू धारमान."

कांगारू बोलना, "मन्ह काय?"
"तुन्ह काय? हा हा हा !
शेपूट म्हनजे पाचवा पाय."

मोर बोलना, "पखे पखे फुलाई धरसू, मी धरसू
पानकायामा नाच मी करसू."

पोपट बोलना, "मस्त मस्त मस्त!
देवबान्या देनगीना ठेवा मान.
आपला शेपूटना उपेग करा."

"नही तर काय हुई?"
"दोन पायना मानूसनागत, आपली शेपूट झडी जाई."

#जय_अहिराणी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवाद
#अहिराणीकाव्यबोली

टीप-मूळ कविता ग.दि.मा. यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment