Tuesday, December 25, 2018

घेता- विंदा करंदीकर


🔶कवी- विंदा  करन्दीकर🔶

🔷कविता-घेता

देणार्‍याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे !

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

🔷अहिराणी अनुवाद

कविता-हा

कवी-नितीन खंडाळे,चाळीसगाव

देनारनी देत जावो;
लेनारनी लेत जावो.

हिरवापिवया रानवरतुन
हिरवीपिवयी शाल ल्हेवो,
सह्याद्रीना कडाकपारीनी
छातीसाठे ढाल ल्हेवो.

येडावाकडा ढगकडतून
येडावाकडा आकार लेवो;
रंघतमधला प्रस्नाससाठे
पुरथमी कडतीन व्हकार ल्हेवो.

खवळेल समुंदरकडतीन
पिसायेल आयाय ल्हेवो;
भरेलशा भीमाकडतीन
तुकोबानी माय ल्हेवो

देनारनी देत जावो;
लेनारनी लेत जावो;
लेता लेता एक दिन
देणारना हात ल्हेवो!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔷तावडी अनुवाद

कविता-घेता

कवी-प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे

देना-यानं देत जाववा ;
घेना-यानं घेत जाववा .

हिरव्यापिवया मायाकडून
हिरवीपिवयी शाल घेववा,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घेववा.

येड्यापिशा ढगांकडून
येडेपिसे आकार घेववा;
रंघतामधल्या परस्नांसाठी
 पुरथवीकडून व्हकार घेववा.

खवयेल समुदराकडून
पिसायेल आयाय घेववा;
भरेल आस्या भीमेकडून
तुकोबाची माय घेववा.

देना-यानं देत जाववा;
घेना-यानं घेत जाववा;
घेता घेता एक दिवस
देना-याचे हात घेववा !
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔷मालवणी अनुवाद

कवयित्री-मेघना जोशी

देणाऱ्यान् देत जावचा

घेणाऱ्यान् घेत जावचा

हिरव्यापिवळया माळावरसून

हिरवीपिवळी शाल घेवची

सह्याद्रीच्या कड्याकडसून

छातीसाठी ढाल घेवची

येडयापिशा ढगाकडसून

येडोपिसो आकार घेवचो

रक्तामदल्या प्रश्नासाटी

जमनीकडसून होयकार घेवचो

खवाळलेल्या दर्याकडसून

पिसाळलेली आयाळ घेवची

भरान व्हावनाऱ्या भीमेकडसून

तुकोबाची माळ घेवची

देणाऱ्यान देत जावचा

घेणाऱ्यान घेत जावचा

घेता घेता एक दिस

देणाऱ्याचे हातच घ्येवचे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादित
#काव्यबोली

टीप-मूळ कविता विंदा करंदीकर यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी

3 comments: