Thursday, September 5, 2019

अनंतचा साक्षात्कार

🛑मूळ कविता 🛑

अनंताचा साक्षात्कार

कवयित्री - कुसुमावती देशपांडे

एखादा मास्तर असा भेटतो -
शाळेची जाम भीती घालतो 
उठता बसता मारतो छडी
थरथर कापतात चिमणे गडी
विद्यार्थी ? छे, गोगलगाय
जीवनभर पोटात पाय !
सदा न् कदा छडी हाती
शाळेची, जीवनाची भीतीच भीती

एखादा मास्तर असा भेटतो -
उस्ताद नसला तरी वस्ताद असतो
प्रत्येक चोरवाटेची चावी
या पठ्ठ्याला अचूक ठावी
कुणापुढे वाकावं, कुणा लाथ मारावी
पैसे कसे पचवावे, कॉपी कशी करावी
सार्‍या विद्यांचे शिक्षण
सदा देतो सोदाहरण

एखादा मास्तर असा भेटतो -
जो ज्ञानाचे पंख देतो
सात स्वर्गांचे दार उघडतो
घरटं बांधायला तोच शिकवतो
घरटं उबदार पिलं शानदार
आभाळातून सारं सांभाळते घार
आभाळाचं मन काही
पिलांना ती देत नाही
नजर तीक्ष्ण एकच लक्ष्य
भक्ष्य भक्ष्य आणखी भक्ष्य !

एखादाच मास्तर असा भेटतो -
डोक्यात घट्ट रुतवून ठेवतो,
भव्य स्वप्नाचा दिव्य बाण !
अंतर्वेधी दृष्टी त्याची
पंखात घालते पंचप्राण !
पंख देतो, देतो शक्ती
नाही देत थिजली शांती
आकाशातून हिंडत असता
भूमीवर खिळवी दृष्टी
नजर नेहमी असतेच त्याची
खुरडणार्‍या पायांवर
दिगंतातून हिंडता हिंडता
दाखवीत असता विश्वाकार
एखादाच गुरू घडवी
अनंताचा साक्षात्कार

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

🛑अहिराणी अनुवाद🛑

नितीन खंडाळे- चाळीसगाव

एखांदाच मास्तर असा भेटस-
शायनी गह्यरी भेव घालस,
उठता बसता मारस छडी
थरथर कापतस बारका गडी
विद्यार्थी ? छ्या, गोगलगाय
जलमभर पोटमा पाय !
सदा न् कदा छडी हातमा
शायनी, जीवनी भेवच भेव

एखांदाच मास्तर असा भेटस -
उस्ताद नसना तरी वस्ताद र्‍हास
हरेक चोरवाटेनी चाबी
या पठ्ठ्याला नेम्मन ठावूक
कुणापुढे वाको, कोन्हले लाथ मारो
पैसा कसा पचाडो, कापी कशी करो
समद्या ईद्यास्न शिक्षन
सदा देस सवता करीसन

एखांदाच मास्तर असा भेटस -
जो ग्यानना पखे देस
साती स्वर्गांस्ना दारे उघाडस
खोपा बांधाले तोच शिकाडस
खोपा उबदार पिल्ला मजाना
आभायम्हाईन समदं समायस घार
आभायन मन काही
पिल्लासले ती देत नही
नजेर बारीक एकच ध्यान
भक्ष्य भक्ष्य आखो भक्ष्य !

एखांदाच मास्तर आसा भेटस -
डोकाम्हान गच खुपशी ठेवस,
भला सपनना भारी बान !
आतम्हजारनी नजेर त्येन्ही 
पखेस्मा घालस पाचीपराण !
पखे देस, देस शक्ती
नही देस गह्यरी शांती
आभायमा फिरत असता
जिमीनवर रोखस द्रिष्टी
नजेर नेहमीच र्‍हास त्येनी
घसडणारा पायेसवर
आभायम्हातून फिरता फिरता
देखाडत जास दुनियादारी 
एखांदाच गुरू घडावस
अनंताना साक्षात्कार

#जय_अहिराणी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवाद
#अहिराणीकाव्यबोली

टीप-मूळ कविता कुसुमावती देशपांडे यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी

Thursday, August 29, 2019

रिण

🔶मूळ कविता🔶

ऋण

कवी-श्री. दि. इनामदार

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥१॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥२॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥३॥

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥४॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥६॥

◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾

🔶अनुवादित-कविता🔶

रिण 

©नितीन खंडाळे, चाळीसगाव

तुन्हा वावरमा राबीसन
मन्ही सरनी हयाती
नका करु हेटायनी
आते उतार वयमा ॥१॥

नही वढावस राज्या
चार पावले नागर
नका बोलजा वंगाय
नका म्हणजा डंगर ॥२॥

मन्ही ऐन उमेदम्हा
मन्ह्या गायात तू वह्या
आते चाबूकनागत
नको देऊ माले गाया  ॥३॥

मन्हा घालावाले शीन
तव्हय खावाडास गुय
कव्हय घालीस झूल
कव्हय घालीस माय ॥४॥

अशा गोड आठवनी
त्येस्न करस वाघूर
माले येवू दे मरन
तुन्ह खुशाल चितत ॥५॥

मरावर तुन्हा जोडे
आखो एकसाव र्‍हाऊ दे
मन्हा कातडाना जोडा
तुन्हा पायमा वाजू दे॥६॥

#जय_अहिराणी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवाद
#अहिराणीकाव्यबोली

टीप-मूळ कविता श्री.दि.इनामदार यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी

Monday, August 19, 2019

असा कसा दगुड झाऊ

🔺मूळ कविता🔺

असा कसा दगड झालो

कवी-नारायण सुर्वे

बाप असून काळ वाटलो त्यांना,
कशी चिडीचीप होऊन समोर
थरथरली पंखांत
हात जोडीत;टिपे गाळीत
'नाही...नाही'चा पुकारा करीत

असा कसा दगड झालो
पिशाच्च झालो
तडाखे हाणीतच राहिलो
कळवळली... किंचाळली...धप्पकन...
तेव्हाच थांबलो.
असा कसा कठोर झालो.

असा कसा दगड झालो...
दगड झाले डोळे
विसरलो पोटचे गोळे.
'पोरं पोसता येत नाहीत तर बाप कशाला झालास?'
शब्द कोसळले.
माझ्याकडेच दया मागणारे माझेच चिमुकले हात
भाविक भोळे!

असा कसा दगड झालो;
दगडच झालो!

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

🔺अहिराणी अनुवाद🔺

असा कसा दगुड झाऊ

©नितीन खंडाळे,चाळीसगाव.  
(१४ जुलै २०१९)  

बाप असीसन काय वाटनु त्यास्ले,
कसा चिडीचीप व्हयीसन सामने
थरथरनात पखेसमा

हाथ जोडीसन;आसू गाळत
'नही...नही' ना पुकारा करत

असा कसा दगुड झाऊ
पिसाच झाऊ
तडाखा हानतच रायनु
कयवयनात... किंचायनात...धप्पकन...
तव्हयच थांबनु.
आसा कसा कठोर झाऊ.

असा कसा दगुड झाऊ...
दगुड झायात डोया
ईसरनु पोटना गोया.
'पोऱ्हे पोसता येत नहीत त बाप कसाले झायास?'
शबुद कोसयनात.
मन्हाकडेच दया मांगणारा मन्हाच एव्हडसा हाथ
भाविक भोया!

असा कसा दगुड झाऊ;
दगुडच झाऊ!
       

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादित
#काव्यबोली

टीप-मूळ कविता नारायण सुर्वे यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी

Wednesday, August 14, 2019

शेपूटवाला जनावरेस्नी

🔺मूळ कविता🔺

शेपटीवाल्या प्राण्यांची

कवी- ग.दि.माडगूळकर

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला,
"मित्रांनो, देवाघरची लूट, देवाघरची लूट
तुम्हां-आम्हां सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय ?"

गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी मारीन माश्या."

घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"

कुत्रा म्हणाला, "खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."

मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."

खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."

माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."

मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात
पोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात."

कांगारू म्हणाले, "माझे काय?"
"तुझे काय? हा हा हा !
शेपूट म्हणजे पाचवा पाय."

मोर म्हणाला, "पीस पीस फुलवून धरीन, मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन."

पोपट म्हणाला, "छान छान छान!
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपुल्या शेपटाचा उपयोग करा."

"नाही तर काय होईल?"
"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪

🔺अहिराणी अनुवाद🔺

कविता-शेपूटवाला जनावरेस्नी

©नितीन खंडाळे

शेपूटवाला जनावरेस्नी  भरनी व्हती सभा
मिठ्ठू व्हता सभापती आधोमध उभा

मिठ्ठू बोलना, मिठ्ठू बोलना,
"मैतरहो, देवघरनी लूट, देवघरनी लूट
तुम्हले-आम्हले समदास्ले एक एक शेपूट,
या शेपूटन करानं काय ?"

गाय बोलशी, "अश्शा अश्शा, शेपूटघई मी मारसु माश्या."

घोडा बोलना, "ध्यानमा धरसू, ध्यानमा धरसू
मीबी मन्हा शेपूटघई, आसच करसू, आसच करसू,"

कुत्रं बोलन, "खुषीमा येसू तव्हय, शेपूट हालावत ऱ्हासू."

मांजर बोलनी, "नही व माय, कुत्रासारख मन्ह आज्याबात नही,
गच्ची गच्ची रागावसू तेव्हय शेपूट फुगाडसू, शेपूट फुगाडसू"

खार बोलनी, "पडी थंडी तव्हय मन्हा शेपूटनी मालेच बंडी."

माकड बोलनं, "कव्हयं वर, कव्हयं खाले, शेपूटवर मी मारसू उडी."

मासा बोलना, "शेपूट म्हनजे दोन हात, दोन हात
पव्हत राहसू धारमान
पव्हत राहसू धारमान."

कांगारू बोलना, "मन्ह काय?"
"तुन्ह काय? हा हा हा !
शेपूट म्हनजे पाचवा पाय."

मोर बोलना, "पखे पखे फुलाई धरसू, मी धरसू
पानकायामा नाच मी करसू."

पोपट बोलना, "मस्त मस्त मस्त!
देवबान्या देनगीना ठेवा मान.
आपला शेपूटना उपेग करा."

"नही तर काय हुई?"
"दोन पायना मानूसनागत, आपली शेपूट झडी जाई."

#जय_अहिराणी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवाद
#अहिराणीकाव्यबोली

टीप-मूळ कविता ग.दि.मा. यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी

Wednesday, February 13, 2019

वेडी-विंदा करंदीकर

🔶कविता-वेडी🔶

कवी-विंदा करंदीकर

एका ढगाला कुशीत घेऊन ती झोपली,
तेव्हा तिला गर्भ राहिला.

पुढे सर्व सुरळीत झाले. आपल्या घरातले मातीचे  मडके
मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली.

वाटेत तिला गाढव भेटले,
तिने त्याची समारंभपूर्वक पूजा केली.

धुपाटण्यातला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली,

''ह्याचीसुद्धा  राख होती तर कोणाला काय सांगणार होत्ये?

पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढे जाते''.

नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली,आणि म्हणाली,

''आता मी कुणाचे काही लागत नाही पौर्णिमेएवढेही.''

पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आहे.)

वेडीला वीज झाली ;आपले स्तन विजेला देऊन

वेडी आपली पुढे गेली;
वाटेमध्ये विदूषक भेटला;

राजा भेटला , राणी भेटली; अ भेटला, ब'भेटला;

पण वेडी शहाणी होती,
तिने कोणालाच ओळखले नाही.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

🔷तावडी अनुवाद

कविता-येडी

कवी-प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे जळगाव

  येका ढगा ले कुशीमधी घीसन ते जपली,तव्हा तिले गर्भ राह्यला.

पुढे समदं नीट झालं.तिच्या घरातलं माटीचं मडकं

मन भरी फोडीसन ते देहान्ताच्या यात्रे ले निंघाली.

वाटमधी तिले गधडं भेटलं ,तिनं त्याची सन्मानानं पुंजा केली.

धोपाटन्यामधला उरेलसुरेल धूप कानफटीले लायीसन ते म्हने ,

'ह्याचीबी राख व्हती तं कोन्हाले काय सांगनार व्हती ?

पन दैव सिकंदर आहे म्हनून कुत्र्यासारखं पुढे जातं .'

  मंग तिनं वडाचे पानं पिप्पयाले लावले,आनं म्हनलं,

  'आता मी कोन्हाचं काही लागत नही पुनवयेव्हढंबी.'

   मंग समदं नीटनेटकं झालं ( हे पहिले सांगलंच आहे.)

   येडीले ईज झाली ;आपले थाने ईजले दीसन

  येडी आपली पुढे गेली; वाटमधी सोंगाड्या भेटला ;

राजा भेटला, रानी भेटली; अ भेटला, ब भेटला ;

  पन येडी शहानी व्हती,तिनं कोन्हालेच वयखलं नही.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔷अहिराणी अनुवाद

कविता-येडी

कवी-धोंडीराम मोरे,चाळीसगाव

एक ढगनासोबत ती निजनी
तवय ती गर्भार ऱ्हायनी .

पुढे सम्द नेंबन झायं
आपना घरनं माटीनं मडकं
मनभरी फोडं मंग तिनी जग सोडं.

वाटम्हा तिले गधडं भेटनं
तिन्ही त्यान्ही पुंजा कई .

चाटूम्हातला उरेलसुरेल धूप
पदरले पुसीसन ती बोलनी,

"यान्ही बी राकज व्हती तं
"कोनले काय सांगनार व्हती...? "

पन तिन्हं तगदीर मोठं
म्हनीसन कुत्रीनागत पुढे पुढे
जातंज ऱ्हायनी.....

मंग 'वडना पानं पिप्पयले ' लायी बोलाले लाघन्ही....

"आते मी कोनीबी, काहीबी लागत न्हई पुनीइतकं सुदीक ."

पुढे सम्दं नेंबन झायं....
(हाई मी पहिलेबी सांगेल से )

येडीले मंग ईज झायी
सवताना थाना ईजले दीसन
येडी पुढे गई.....

वाटवर तिले 'सोंगाड्या ' भेटना;
'राजा' भेटना ;'रानी' भेटनी ;
'आमका' भेटना ;'टमका' भेटना ;
  पन ' येडी ' मोठी शानी व्हती ;
तिन्ही कोनलेज वयखं न्हई.... !!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔷वऱ्हाडी अनुवाद

कविता-म्याट

कवी- लोकमित्र संजय,नागपूर

एका ढगाले संग घेऊन ते झोपली
तेवा तीले गर्भ रायला

समोर सार चोकट झाल आपल्या घरातल मातीच मडक
मनभरुन फोळून ते
देहांताच्या जत्रेले निंगाली

रस्त्यात तीले गध भेटल,तीन
त्याची साजरी पूजा केली

धुपाटण्यातला उरला सुरला धूप
कानफटाले लावून ते म्हणाली

याची पण राख होते तं कोणाले
काय सांगणार होती ?

पण नशीब शिकंदर हाय म्हणून
कुत्र्यासारख पुडे जाते

मंग तीन वडाची पान पिंपळाले
लावली अन म्हणे

आता  मी कोणाच कायी लागत नायी पोरणीमे एवडी

समोर सार चोकट झाल(मांग सांगतलच आहे)

म्याट वीज झाली, आपले थान विजेले देऊन गेली.

म्याट पुडे गेली,रस्त्यात
जोकर भेटला

राजा भेटला ,राणी भेटली, अ भेटला, ब भेटला

पण म्याट शायनी होती,तीन
कोणालेच वयखल नायी.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔷मालवणी अनुवाद

कविता-खुळग्या

कवयित्री-कल्पना मलये,मालवण

एका ढगाक कुशीत घेवन जेवा ता निजला
तेवा ता गुरवार रवला

फुडे सगळा यवस्थित झाला .आपल्या घरातला मातयेचा मडक्या
मनासारख्या फोडल्यान आनि ता मयताक चलाक लागला.

वाटेत तेका गाढाव भेटला,तेनी तेची यवस्थित पूजा केल्यान

धुपाटण्यातलो उरलोसुरलो धूप तेनी कनवटेक लावल्यान आनि ता हुनला,

हेचीव रखा व्हती तर कोनाक काय सांगनार व्हतय?

पन दैव शिकंदर हा म्हनान कुत्र्यासारख्या फुडे जाता.

नंतर तेनी वडाची पाना पिपळाक लावल्यान ,आनि  
हुनला

आता मी कोनाचा  काय लागनय नाय पोरनिमेइतक्याव

फुडे सगळा यवस्थित झाला ( ह्या मागेच सांगलेला हा.)

खुळग्याक ईज झाली ; आपली दूधा ईजेक देवन

खुळग्या आपला फुडे गेला ; वाटेत ईदूषक भेटलो;

राजा भेटलो,रानी भेटली;अमको भेटलो,तमको भेटलो;

पन खुळग्या शेना व्हता ,तेनी कोनाकच वळखाक नाय.
 
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
 
🔷आगरी अनुवाद

कविता-येरी

कवी-तुषार म्हात्रे,पिरकोन (उरण)

यके ढगाला कुशीन झेऊन ती निजली
तव ती पोटाशी ऱ्हाली
पुऱ्हचा सगला यवस्थित झाला.
आपले घरनचं मातीचं मरकं फोरून ती मरनाचे यात्रला निंघली.
वाटंन तिला गाऱ्हव भेटला,
तिनी त्याला बराबर पुजला
धुपाटनंचा ऱ्हालेला धूप कनवटीला लावून ती बोलली
“याचीपून राख व्हतंय तं कोनला काय सांगनार व्हतू?
पुन नशिब शिकंदर हाय म्हंगून कुत्रंसारी पुऱ्ह जातंय.”
मंग तिनी वराची पाना पिपलाला लावली न बोलली,
“आथा मी कोनचा काय लागं नाय पुनवंइतका.”
पुऱ्ह सगला यवस्थित झाला(या मिनी सांगलेलाच हाय)
येरीला इज झाली, आपलं थान इजला देऊन
येरी आपली पुऱ्ह जेली; वाटंन
इदुषक भेटला;
राजा भेटला, रानी भेटली; ‘अ’ भेटला, ‘ब’ भेटला;
पुन येरी शानी व्हती, तिनी
कोनलाच वलखला नाय.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

टिपण:- प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव
   ९७३०२२११५५

वेडी -प्रतिभा,नवनिर्माणक्षम प्रज्ञा

ढग  --निर्मितीची बिजे असलेला अनुभव

गर्भ  -- अनुभवाच्या प्रेरणेने
      कलाकृती बीजरूपास येणे

मातीचे मडके  --- पूर्वानुभव ,कलाकृतीत रूपांतरीत होण्याआधीची अवस्था

गाढव  --- त्या कलेतलं काहीही न कळणारा

राख होणे -- ब-याच कलाकृतींचा गर्भपात होतो. वाफ होऊन जाते .आकाराला येतच नाही.

वडाची पाने पिंपळाला लावणे  -- येथेही *साल* च्या ऐवजी पाने .

कलाकृतीत तार्किकता नसते.सुसंगती नसते.

कलाकृतीला पूर्णत्व आले की कशाचीही पर्वा नसते.

पौर्णिमा  --पूर्णत्व

वीज --ढगात वीज निर्माण होते.

वीज --- निर्मिती

स्तन  --- पोषणद्रव्य

विदूषक --- कोणत्याही गोष्टींची खिल्ली उडवणार

राजा  /राणी -- त्या कलेतील अधिकारी ,जाणकार
 
अ ,ब  --  नाव रूप ,ओळख नसलेले वाचक,समीक्षक

शहाणी --कोणाचीही दखल
  न घेणारी शहाणी.

प्रतिभा ही कोणाचीही ,निंदा ,स्तुतीची दखल घेत नाही म्हणून शहाणी .

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादित
#काव्यबोली

टीप-मूळ कविता विंदा करंदीकर यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी